सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : येथील बालकलावंतांनी महाराष्ट्र शासन कामगार विभाग महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे "पुस्तकाच्या पानातून" हा नाट्य प्रयोग चंद्रपूर येथील ललित कला भवन, बंगाली कॅम्प, मध्ये सादर झाला.
सागर झेप संस्था ही वणी शहरांमध्ये विविध नाट्यकला, नृत्य संगीत व सामाजिक सांस्कृतिक कार्यात अग्रेसर आहे.शहरात नाट्यकला जिवंत ठेवण्याचं कार्य सागर मुने करत असून नवनवीन कलावंताना व्यासपीठ देण्याचं कार्य करित असतात. यापूर्वी देखील महिला नाटक, बालनाट्य, राज्य नाट्य स्पर्धेमध्ये नवनवीन कलावंतांना अभिनयाचे धडे देत पारितोषिक प्राप्त केलेले आहे. यावर्षी सुद्धा सागर मुने यांच्या मार्गदर्शनामध्ये चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेऊन द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त करून उत्कृष्ट दिग्दर्शक व उत्कृष्ट अभिनय चे पारितोषिक मिळवून दिले आहे. चंद्रपूर येथे 17 डिसें. ला बालनाट्य स्पर्धा संपन्न झाली असून, लेखक अॅड. गौरव खोंड लिखित पुस्तकाच्या पानातून हे बालनाट्य सादर करण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट दिग्दर्शक तिसरा क्रमांक मंगेश गोहोकार, उत्कृष्ट अभिनय तेजेश्वर खुसपुरे व वसुंधरा नघाटे यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला. माही खुसपुरे, तन्मय कंदलवार, स्मित राऊत, रोहिणी नघाटे, हिमांशू गोडे, सोनाक्षी खुसपुरे यांनी नाटकात सुंदर अभिनय केला.
यावेळी आकाश महाडुळे, सुरेश चिकटे, यासह पालकांनी बाल नाट्य यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले.
वणीच्या बाल नाट्यकलावंतांनी पटकाविले पारितोषिक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 18, 2024
Rating: