डॉ. आंबेडकरांचा अपमान, आक्रमक विरोधकांचा बुधवारी संसदेत हंगामा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : काँग्रेस पक्षासाठी आंबेडकराचे नाव घेणे 'फॅशन' बनले आहे. जर त्यांनी इतक्या वेळा आंबेडकरांऐवजी देवाचे नाव घेतले असते तर त्यांना 7 जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत केले. असे वक्तव्य करून अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत आक्रमक विरोधकांनी बुधवारी संसदेत हंगामा करत अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
संविधानाला ७५ वर्षे झाल्याप्रित्यर्थ संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन दिवसीय चर्चा झाली. या चर्चेचा समारोप करताना मंगळवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत काही विधाने केली. 'आता ही फॅशन झाली आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर... इतक्या वेळा नाव जर देवाचे घेतले असते तर त्यांना सात जन्मासाठी स्वर्ग मिळाला असता,' असे वादग्रस्त वक्तव्य अमित शाह यांनी केले. अमित शाह हे वक्तव्य करत असताना काँग्रेस सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतले.
बुधवारी संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष या मुद्द्यावर आक्रमक झाला. विरोधी पक्षांनी बुधवारी या मुद्यावर चर्चेसाठी नोटीस दिली आणि अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी केली. दोन्ही सभागृहात चर्चेची परवानगी नाकारल्यानंतर विरोधी पक्षाने घोषणाबाजी केली. 
डॉ. आंबेडकरांचा अपमान, आक्रमक विरोधकांचा बुधवारी संसदेत हंगामा डॉ. आंबेडकरांचा अपमान, आक्रमक विरोधकांचा बुधवारी संसदेत हंगामा Reviewed by सह्याद्री चौफेर on December 19, 2024 Rating: 5
Powered by Blogger.