सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : रस्त्याच्या नवीन बांधकामासाठी आतापर्यंत विविध मार्गाने संबंधित विभागाला अवगत केले. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. तारीख पे तारीख" मिळत आहे. त्यामुळे याप्रकरणी आता वेळाबाई, मोहदा, ग्रामवाशी आक्रमक झाली आहे. त्यांनी मोहदा, केशवनगर, वेळाबाई ते आबाई फाटा या रस्त्यासाठी वेळाबाई बसस्थानक येथे उद्या (ता. 17 डिसें.) ला सकाळी 9.30 वा. चक्काजाम आंदोलन करणार आहे. अशी माहिती स्थानिक ग्राम. पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
धुळी मुळे रस्त्यालगत शेतमालाचे, अपघाताचे प्रमाण तसेंच आरोग्यावर मोठा परिणाम होत असताना वारंवार याबाबत निवेदन देऊन सुद्धा दुर्लक्ष होत असल्यामुळे नवीन बांधकाम करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात वेळाबाई मोहदा नागरिकांनी एल्गार पुकाराला असून ते आपल्या मागणीसाठी आता रस्त्यावर उतरणार आहेत. आज सोमवार ला होणारे चक्का जाम आंदोलन उद्या मंगळवारी ठरल्याप्रमाणे करण्यात येणार आहे. परिसरातील जनतेनी मोठ्या संख्येने या चक्काजाम आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सुद्धा केले आहे.
उद्या रस्त्यासाठी नागरिकांचे चक्का जाम आंदोलन; ग्रामपंचायत पदाधिकारी उतरणार रस्त्यावर..
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 16, 2024
Rating: