वृद्धाश्रमात पत्नीचा वाढदिवस साजरा करून चेहर्‍यावर फुलवला आनंद

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : येथील लोकमान्य महाविद्यालयात ग्रंथालय परिचय असलेले संतोष चांदेकर यांनी आपल्या जीवनचारणी पत्नीचा वाढदिवस श्री बाजीराव महाराज वृद्धाश्रम, पळसोनी वृद्धाश्रमात सोमवारी साजरा केला आहे.
लोकमान्य महाविद्यालयात ग्रंथालय परिचय म्हणून असलेले संतोष चांदेकर यांच्या पत्नीचा सोमवारी 16 डिसें.रोजी वाढदिवस होता. त्यांनी वाढदिवस पळसोनी येथील श्री बाजीराव महाराज वृद्धाश्रमातील वृद्धा सोबत केक, तसेच शाल भेटवस्तू देऊन त्याठिकाणी वाढदिवस साजरा केला. यावेळी वृद्ध, महिला, पुरुष यांना भेटवस्तू, व भोजनदान देऊन त्यांच्या सह भोजनाचा आश्वाद घेऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आदित्य वाघमारे यांनी वृद्धाश्रमाला पन्नास किलो साखर दान दिली. यामुळे वृद्धाश्रमातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळक होती. यावेळी सौ.सपना संतोष चांदेकर यांना त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभआशीर्वाद दिला.
यावेळी श्री बाजीराव महाराज वृद्धाश्रमचे अध्यक्ष सुहास नांदेकर, कोष्याध्यक्ष. श्री.नामदेव शेलवडे, उपाध्यक्ष श्री. दिलीप मालेकर, सचिव मारोती चोपणे यांच्यासह लायब्ररी अटेंडन संतोष चांदेकर, गीत घोष, रमेश मडावी,सौ. सुवर्णा मडावी, अशोक राजगडकर, सौ मेघा राजगडकर, भगवान आत्राम, सौ.इंदिरा आत्राम, श्रीकृष्ण मडावी, पत्रकार सचिन मेश्राम, संदीप बेसरकर, कुमार अमोल, महेश आत्राम तसेंच वाघमारे परिवार उपस्थित होते.
वृद्धाश्रमात पत्नीचा वाढदिवस साजरा करून चेहर्‍यावर फुलवला आनंद वृद्धाश्रमात पत्नीचा वाढदिवस साजरा करून चेहर्‍यावर फुलवला आनंद Reviewed by सह्याद्री चौफेर on December 16, 2024 Rating: 5
Powered by Blogger.