पाटणा आई देवस्थान माथार्जुन येथे पोलिस पाटील दिन साजरा

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी  
 
झरी जामणी : पोलीस पाटील हे पद प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे. त्या काळी हे पद गावातील शूर व कर्तृत्वान व्यक्तीकडे दिल्या जाई .शिवाजी महाराजांच्या काळापासून तसेच पोलीस पाटील हे पद आस्तित्वात आहे . पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य हि संघटना गेले 50 वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील पोलीस पाटील यांच्यासाठी कार्यरत आहे. संस्थेचे पूर्वीचे नाव विदर्भ पोलीस पाटील कल्याणकारी संघ असे होते ते बदलवून "पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य" या नावाने कामगार आयुक्ताकडे श्रमिक संघ अधिनियम १९६७ अन्वये दि. १ मे २०२० रोजी नोंदणीकृत करून घेतले आहे.

तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेने केला पोलीस पाटील दिनानिमित्त मार्गदर्शन शिबिर व स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्निल ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून मारेगाव तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष भाऊराव टेकाम पाटील मुकुटबन पोलिस स्टेशन अध्यक्ष सचिन उपरे पाटील, उपाध्यक्ष शिरपुरे पाटील तसेच माथाजून ग्रामपंचायतच्या सरपंच सौ भागीरथ आत्राम उपसरपंच रवींद्र कायतावर सामाजिक कार्यकर्ता संतोष जंगीलवार पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय निंदेकर ,योगेश मडावी पत्रकार यावेळी उपस्थित होते सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने जील्हा परिषद शाळा गारगोटी येथील शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कूळसंगे पाटील यांनी केल तर प्रास्तावना विनोद पेरकावार पाटील यांनी केली.असून मारेगाव तालुक्यातील पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष भाऊराव टेकाम यांनी मार्गदर्शन केले यावेळेस ते म्हणाले की समाजामध्ये पाटील काम करताना अनेक अडचणी येत असतात त्या अडचणीला आम्ही दूर सारून एक अग्रेसर होऊन आमचे भूमिका पार पाडतो असतो व आम्ही गाव पातळीवर काम करत असताना कर्तव्य आम्ही योग्य पार पाडतो. पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्निल ठाकरे हे म्हणाले की तालुक्यातील पोलीस पाटील संघटना सज्ज असून पोलीस प्रशासनाकडून दिलेले काम योग्यरीत्या पार पाडत असतात असे मार्गदर्शन करत पोलीस पाटील दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

 तालुक्यातील पोलीस पाटील यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमात उपस्थिती लावली होती या पोलीस पाटील दिनानिमित्त झरि तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रकाश गेडाम पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
पाटणा आई देवस्थान माथार्जुन येथे पोलिस पाटील दिन साजरा पाटणा आई देवस्थान माथार्जुन येथे पोलिस पाटील दिन साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on December 17, 2024 Rating: 5
Powered by Blogger.