मोहदा-वेळाबाई स्थानिकांचे आंदोलन स्थगित

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : केशवनगर, मोहदा, वेळाबाई ते आबई फाटा या रस्त्याचे नवीन बांधकाम सुरु करण्यासाठी आज मंगळवारी शेकडो स्थानिकांनी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन सुरु केले, त्याचा धसका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने आंदोलनस्थळी जावून शक्य तितक्या लवकर काम सुरु करण्यात येईल असे, लेखी पत्र देऊन स्थानिकांनी आंदोलन तूर्तास मागे घेतले आहे. 
मागील 26/7/2024, त्यानंतर 9/12/2024 व 12/12/2024 रोजीपासून मोहदा वेळाबाई केशवनगर ते आबई फाटा या क्षतीग्रस्त रस्त्यासाठी स्थानिकांची मागणी आहे. अनेकदा लेखी हो म्हणूनही संबंधित बांधकाम विभाग नुसतं खो देत असून यासंदर्भात काहीच हालचाली करत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी मंगळवारी (17 डिसें.) वेळाबाई बसस्थानकांसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, त्यानुसार प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने सरपंच व ग्रामस्थांनी सकापासून उपोषण सुरू केले होते. या साठी लोकप्रतिनिधी, उपविभागीय कार्यालय, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाला अवगत करण्यात आले होते. या अगोदर सुद्धा मोहदा वेळाबाई ते आबई फाटा मार्गासाठी आंदोलनही करण्यात आले होते, त्यावेळी सुद्धा संबंधित विभागाने मंजूर असल्याचे आणि सदर रस्त्याचे काम तातडीने सुरु करण्यात येईल असे पत्राद्वारे कळविले.
मात्र,तारीख पे तारीख,रस्त्याचे काम पुढं मार्गी लागत नसल्याने पुन्हा येथील सरपंच,मोहदा वेळाबाई व परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराविरोधात आज दि. 17 डिसें. 2024 रोजी वेळाबाई बसस्थानकांवर डेरा टाकून रास्ता रोको आंदोलन सुरु केले. सकाळी साडे नऊ वाजेपासून शेकडो नागरिकांनी आंदोलनस्थळी एकत्र येऊन आंदोलनाच्या माध्यमातून आपली मागणी केली,नागरिकांची गर्दी पाहून संबंधित विभागाने दुपारी अडीच वाजता सरपंच उपसरपंच आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिलेले तालुका सरपंच संघटनेचे सर्व. पदाधिकारी यांच्या उपस्थितीत लेखी आश्वासनानंतर हे चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आले. तूर्तास त्या मार्गांवर काम सुरु होई पर्यंत डेली पाणी मारणार अशी लेखी हमी दिली आहे.
यादरम्यान, जवळपास 7 ते 8 तास जड वाहतुक कोलमडली होती, सदर मार्गांवर लांबच लांब अवजड वाहणाच्या रांगाच रांगा पहायला मिळाल्या होत्या. परिणामी रस्त्याचे काम सुरु न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडणार असा उपस्थित नागरिकातून संतप्त सूर उमटत होता. आता स्थानिकांच्या आंदोलनाची संबंधित विभाग कितीपत दखल घेतात की, पुन्हा आंदोलन छेडणार, याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.
मोहदा-वेळाबाई स्थानिकांचे आंदोलन स्थगित मोहदा-वेळाबाई स्थानिकांचे आंदोलन स्थगित Reviewed by सह्याद्री चौफेर on December 18, 2024 Rating: 5
Powered by Blogger.