अपघातात पत्नी ठार तर,पती गंभीर



सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : नांदेपेरा मार्गांवर दुचाकीला भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने पत्नी जागीच ठार झाली तर, पती गंभीर जखमी झाले असून त्याचे वर नागपूर येथे उपचार सुरु आहे. ही घटना रविवारी २२ डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली.

शुभांगी पुंडलिक वऱ्हाटे (वय अंदाजे ४८ वर्षे) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर महिलेचा पती पुंडलिक वऱ्हाटे (वय अंदाजे ५५ वर्षे) या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांचे नाव आहे.ते वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील रहिवाशी आहे.

वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील हे दाम्पत्य बारशाच्या कार्यक्रमासाठी तालुक्यातील लाखापूर येथे आले होते. लाखापूर येथे नातेवाईक हरिभाऊ बल्की यांच्या कडील कार्यक्रम आटोपून ते पती-पत्नी हे दुचाकीने आपल्या स्वगावी परत जात असतांना वणी-नांदेपेरा मार्गांवरील स्वर्णलीला शाळेच्या पुढे सोयाबीन कंपनी नजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचे समजते. दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहन हे भरधाव वेगात घटनास्थळावरून पसार झाल्याचेही बोलल्या जात आहे. 

थार नावाचे हे वाहन असल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. या अपघातात पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला व दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर वणी नंतर चंद्रपूर वरून नागपूर येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरु आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा पोलिस प्रशासनाकडून जलदगतीने शोध घेतला जात आहे. घटनेचा अधिक तपास वणी पोलीस करीत आहे.
अपघातात पत्नी ठार तर,पती गंभीर अपघातात पत्नी ठार तर,पती गंभीर Reviewed by सह्याद्री चौफेर on December 23, 2024 Rating: 5
Powered by Blogger.