सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त 22 डिसेंबर हा दिवस गणित दिवस म्हणून साजरा केला जातो.या निमित्ताने राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालयात गणित दिनाचे आयोजन करण्यात आले.
गणित अधिक मनोरंजन व सोप्या पद्धतीने कसा शिकवला जाऊ शकतो व गणित विषय व्यावहारिक जीवनाशी कसा संबंधित आहे हे विविध उपक्रम व कृतिद्वारे याप्रसंगी दर्शविण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.अभय पारखी सर होते तर, प्रमुख अतिथी म्हणुन मराठी विज्ञान परिषद वणी विभागचे अध्यक्ष प्रा.महादेवराव खाडे होते.त्यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर व कार्यावर माहिती दिली.
गणितातील विविध संकल्पना सोप्या पद्धतीने सादर करण्यात आल्या विद्यार्थ्यांकडून कोडी उखाणे म्हणी यांच्या साह्याने गणित कसे शिकवल्या जाऊ शकते याचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. तसेच अध्यक्षीय मार्गदर्शनान पारखी सर यांनी गणीतातील संबोध सोपे कसे करता येईल व मनोरंजनातुन शिक्षण या बाबीवर प्रकाश टाकला. सर्व विद्यार्थ्यांनी याप्रसंगी उस्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अनिता टोंगे, संचालन श्री तुषार गाणे तर आभार प्रदर्शन सौ श्रेया ढवस यांनी केले. यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारयांनी अथक परिश्रम घेतले.
राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 23, 2024
Rating: