विहिरीत उडी मारून विवाहित तरुणाची आत्महत्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील मांगरूळ येथील गोपाल मधुकर ठाकरे (36) या विवाहित तरुणाने गावाजवळील शेतात असलेल्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मृतक गोपाल हा शेत कामासह मिस्त्री (स्टाईल) चे काम करत होता. रात्रभर बेपत्ता असलेल्या गोपाल ठाकरेंचा मृतदेह एका विहिरीत 3 वाजता आढळून आला. नात्यातील लोकांनी लगेंच पोलिसांना ही माहिती दिली. पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले. सदर तरुणाचा मृतदेह विहिरीतून वर काढला होता. मारेगाव पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह वैद्यकीय इस्पितळात शिवचिकित्सेसाठी पाठवला.

मयत गोपाल ठाकरे यांच्या पाठीमागे आई वडील,पत्नी व एक मुलगी आणि चार विवाहित बहिणी आहेत. गोपाल यांनी का विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली हे कळले नाही. यासंबंधीचा तपास मारेगाव पोलिस निरीक्षक संजय साळूंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ए एस आय किसन संकुरवार करत आहेत.
विहिरीत उडी मारून विवाहित तरुणाची आत्महत्या विहिरीत उडी मारून विवाहित तरुणाची आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on December 22, 2024 Rating: 5
Powered by Blogger.