टॉप बातम्या

राष्ट्रवादी मधून उद्धवसेनेत घरवापसी

सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था 

मारेगाव : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून राजकारण चालू असून या राजकारणाचे बळी कार्यकर्ते होत आहे. त्यामुळे आपल्या सोबतही राजकारण होऊ नये म्हणून व शेतकरी पुत्र नात्याने शेतकऱ्याची वाहतात बघता राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत कोसरा येथील उपसरपंच सचिन पचारे यांनी विचार केला आणि शिवसेनेत (उबाठा) घरवापसी करत आज (ता. 29) ला खा. संजय देशमुख (यवतमाळ-वासीम) व राजेंद्र गायकवाड (यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख) यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांसह वणी येथे प्रवेश घेतला. यामध्ये अतुल पचारे, कडू पाटील, राजू येरेकर, सुमित पचारे, कुंडलिक पचारे, राजू पचारे, शंकर पचारे, दादा पचारे, दिलीप येडमे, महेश पाटील, व असंख्य कार्यकर्त्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. 
Previous Post Next Post