टॉप बातम्या

30 वर्षीय युवकाची विष प्राशन करून आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या वडगाव येथील शेतकरी पुत्राने शेतामध्ये जाऊन विषाचा घोट घेत आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना मंगळवार, दि.29 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. या दुःखद घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 
राहुल अंबादास ठावरी (वय 30) रा. वडगाव असे विष प्राशन केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याला मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गेल्या आठ ते दहा वर्षापासून राहुल स्पर्धा परीक्षेची वणीत तयारी करत होता. सोबत ग्राऊंड वर प्रॅक्टिस करायचा,काल स्वगृही आला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलत गावा शेजारी असलेल्या शेतात विष प्राशन करून जगाचा निरोप घेतला. वृत्त लिहे पर्यंत कारवाई व्हायची होती. 
मागील काही दिवसापासून मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले असून राहुल याच्या आत्महत्येचे मात्र,कारण अस्पष्ट असून मृतकाच्या पाठीमागे आई, वडील, एक भाऊ, असा परिवार आहे.
Previous Post Next Post