सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था
वणी : अध्यक्ष हरीश दिगांबर पाते यांनी मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी उपविभागीय कार्यालय वणी येथे आपले नामांकन अर्ज भरला आहे.
यावेळी अर्चनाताई कांबळे, विशाखाताई लोखंडे, बेबीताई गाडगे, मधुमती वाळके, रजत सातपुते, रविंद्र कांबळे, सत्तार शेख, देवानंद झाडे, गौतम जीवने, प्रशांत गाडगे, सचिन मडावी, प्रशांत मडावी, पुखराज खैरे, शिवाजी दूपारे, आकाश बोरकर, अनिल पथाडे, बुद्धघोष लोणारे, नरेंद्र वाळके, गोलू गारघाटे, रवी विरुरकर, विनोद डुंबरे, हर्षल चामुलवार, दीपक उमरे, राणू कुमराम, राहुल दोरखंडे यासह असंख्य समर्थकांची उपस्थिती होती.
वणी विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचा विश्वास जिंकून मतदार संघाच्या विकासासाठी आणि एसी, एसटी ओबीसी प्रवर्गातील जनतेला न्याय देण्यासाठी जे धोरण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला लढ्याला बळ मिळेल त्याकरिता दिनांक २९ ऑक्टोबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून असंख्य कार्यकर्त्याच्या साक्षीने हरीश दिगांबर पाते यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केला आहे.
हरीश पाते उम्मेदवारी अर्ज अपक्ष भरून निवडणूक लढवत असल्यामुळे होऊ घातलेली वणी विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही अतिशय चूर्षीची होणार आहे.
हरीश दिगांबर पाते अध्यक्ष, उम्मेदवारी अर्ज अपक्ष
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 30, 2024
Rating: