सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत आयारामांना उमेदवारी दिल्याने राज्यातील अनेक मतदार संघात बंडखोरी पहायला मिळत असून 76- वणी मतदार संघात सुद्धा कमालीची बंडखोरी झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
यामध्ये काँग्रेसचे संजय खाडे, एमआयएमचे आसिम हुसैन मंजूर हुसैन, वंचित बहुजन आघाडीचे हरीश पाते, आपचे निखिल धर्मा ढुरके यांनी बंडखोरी करत अपक्ष नामांकन अर्ज दाखल केला आहे.
गेल्या काही दिवसापासून वणी विधानसभा क्षेत्रात राजकीय वातावरण चांगलेच गरम असल्याचे दिसून येत असून ते काही केल्या थंड व्हायचे नाव घेत नाहीये. महाविकास आघाडीच्या उमेदवाराने आपली उमेदवारी दाखल केली, यादरम्यान अनेक नेते, पुढारी, पदाधिकारी व कार्यकर्ते या क्षणी उपस्थित होती, परंतु एक दोन बड्या नेत्याच्या अनुपस्थितीने वणीच्या राजकारणाचं वातावरण जस काही "इसकी टोपी उसके सर"...असं वाटत असल्याचे बोलल्या जात होत. खरंतर वणी मतदार संघासाठी उमेदवार यावेळी कर्ता, अनुभवी, दूरदृष्टी व जनतेशी नाळ जुळवून घेणारा हवा, अशी या रणधूमाळीने चर्चा रंगू लागल्या आहे. त्यामुळे बंडखोर उमेदवारांची मनधरणी, रिंगणातील उमेदवारांची डोकेदुखी वाढवणार का? किंबहुना बंडखोरांना थोपवण्याचे तगडे आव्हान उमेदवारांना असणार आहे.
विशेष उल्लेखनीय की, यावेळीची निवडणूक मागील लोकसभेची पुनरावृत्ती इथं होऊ नये म्हणजे झाले, कारण हीच वेळ असल्याने कोण? कोणाची "जिरवेल" आणि "मिरवेल" हे येत्या 23 नोव्हेंबर ला पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहेत.
बंडखोर उमेदवारांची मनधरणी, रिंगणातील उमेदवारांची वाढवणार डोकेदुखी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 31, 2024
Rating: