सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : होऊ घातलेल्या विधान सभेच्या निवडणूकीचे बिगूल वाजताच राजु उंबरकर यांच्या कार्यकर्त्याकडून जोरदार प्रचाराला सूरूवात झाल्याचे चित्र खेडोपाडी पहायला मिळत आहे. उंबरकर यांना विधानसभेत पाठविण्यासाठी अख्खे कार्यकर्ते कामाला लागल्याचे दिसून येत आहे. नुकतेच मनसेचे नेते राजु उंबरकर यांनी उमेदवारी दाखल केल्यानंतर वणी विधानसभा मतदार संघांत विरोधकांच्या तुलनेत आमदार म्हणून राजु उंबरकर फिक्स असे बोलल्या जात आहे.
वणी मतदार संघात राजु उंबरकर यांची अल्पावधीतच ओळख कार्यसम्राट कार्यकर्ता म्हणून आहे. 18 ते 20 वर्षांच्या कार्यकाळातील सामाजिक कार्याची ही ओळख त्यांना यश देणार असुन त्यांचा साधेपणा व ते मतदार संघात करत असलेले कार्य विरोधकांवर भारी पडणार असल्याने कितीही रान ऊठवले तरी, बाजी राजु उंबरकरच मारणार असे बोलल्या जात आहे. मतदार संघातील रहिवासी असल्याने त्यांना मतदार संघातील अनेक समस्या माहीत आहे. आपल्या कार्याच्या जोरावर त्यानी मतदार संघात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकांसमोर जाणे त्याचे सोबत बसणे चर्चा करणे आणि जागच्या जागी प्रश्न सोडविणे असे त्याच्या कार्याची पद्धत आहे. जी लोकांना ही पटत आहे. त्या मुळेच राजु उंबरकर आमदार बनण्याशाठी कारणीभूत असून कार्यकर्तेही कामाला लागले आहे. उंबरकर यांनी मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार मेळावे घेतले. नागरिकाच्या होणाऱ्या हालअपेष्टा लोकं दरबारी लाऊन जागच्या जागीच सोडवितात म्हणून नागरीक देखील त्यांच्याकडे आशेने ने पहात असल्याचे दिसून येत आहे.
वणी विधानसभा मतदार संघात मनसे चे उमेदवार राजु उंबरकर विजयी होणार यासाठी मनसैनिकांनी कंबर कसल्याचे कार्यकर्त्यातून बोलल्या जात आहे. वणी, मारेगाव, झरी, मुकुटबन, पाटण शहरासह ग्रामीण भागामध्ये कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घराघरापर्यंत जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेत पक्षाच्या व उमेदवारांच्या भूमिका विषद करण्यावर भर देत असल्याचे दिसून येत आहे.
मनसेचा प्रचार झंजावात: राजु उंबरकर यांना विधानसभेत पाठविण्यासाठी कार्यकर्ते लागले कामाला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 29, 2024
Rating: