टॉप बातम्या

वणी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी


सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ ऑक्टोबरपासून आचार संहिता लागू झाली आहे. या नियमांनुसार, निवडणूक निकाल लागेपर्यंत शहरात लावलेले राजकीय पक्षांचे बॅनर, पोस्टर आणि फ्लेक्स बोर्ड काढण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. 

मात्र, वणी शहरातील यात्रा मैदान परिसरात सार्वजनिक शौचालय आणि गाळ्यांच्या भिंतीवर असलेले एका राजकीय नेत्याचे पोस्टर अद्याप काढले गेले नाही. 

याबद्दल जबाबदार असलेल्या मुख्याधिकाऱ्यांवर आचार संहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता रवींद्र धर्मराव कांबळे यांनी वणी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून केली आहे.
Previous Post Next Post