आरोपिंना दोन दिवसाची पोलीस कोठडी


सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभा-बोटोणी मार्गांवरील श्रीरामपूर नजीक 24 ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास एका इसमाचा दुपट्याने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. सदर प्रकरणातील आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. 

भीमराव तुकाराम मडावी (वय 31) रा. बाबई पोड (श्रीरामपूर) असे या घटनेत हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाबई पोड (श्रीरामपूर) येथील भीमराव तुकाराम कोडापे (वय 31) यांचा कुंभा येथील महादेव पुसदेकर व संतोष पडोळे यांचेसोबत वाद झाला. त्यानंतर भीमराव रात्री उशीरा आपल्या गावाकडे परत जात असतांना मार्गात असलेल्या उलमाले यांचे शेताजवळ संशयित महादेव पुसदेकर व संतोष पडोळे या दोघांनी भीमराव याचा दुपट्याने गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी कलम 103 (1),3(5) नुसार गुन्ह्यांची नोंद करीत तपासाची चक्रे फिरवून संशयित आरोपी महादेव पुसदेकर (वय 32) व संतोष पडोळे (वय 29) दोघेही रा.कुंभा, यांना अटक करून ताब्यात घेतले. आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. 

अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार संजय सोळंके यांचेसह जमादार अजय वाभीटकर रजनीकांत पाटील हे करीत आहे.
आरोपिंना दोन दिवसाची पोलीस कोठडी आरोपिंना दोन दिवसाची पोलीस कोठडी Reviewed by सह्याद्री चौफेर on October 26, 2024 Rating: 5
Powered by Blogger.