घोन्सा परीसरात कोंबडबाजारासह जुगार

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : मुकूटबन पोलीस स्टेशन अतर्गत येत असलेल्या घोन्सा परीसरात खुलेआम कोंबडबाजार सुरू असुन या बाजारात अवैध जुगार ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. घोन्सा परीसरात कोंबडबाजार भरविण्यासाठी परवानगी दिल्याने कोंबडबाजार ठेकदाराने कोंबडबाजार खुलेआम सुरू केला आहे. अवैध धंदेउच्चाटन करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे मनोधर्य केवळ नाममात्र ठरले असुन दररोज या ठिकाणी कोंबडबाजार भरविला जात आहे. विशेष म्हणजे या कोंबडबाजारात कोंबडच्या झुंजी लावण्यासाठी पंचक्रोशीतील जुगारी या बाजारात येताना दिसत आहे. 

कोंबडबाजारासह यामध्ये पत्याचे डाव मांडले जातात यात अंदर बाहर, एक्का बादशहा, तीन पत्ती चे खेळ खेळविले जात आहे. हा बाजार चांगलाच फुलला असुन बिट जमादारही या बाजारात आपले नशीब आजमवत असल्याचे बोलल्या जात आहे. घोन्सा परीसरात शेतकरी शेतमजुर मोठ्या संख्येने असुन या ठिकाणी आदिवासीबहुल परीसर आहे. या परीसरात अवैध दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. मात्र,पोलीस या सर्व गंभीर बाबीची दखल घेत नाही.
घोन्सा परीसरात कोंबडबाजारासह जुगार घोन्सा परीसरात कोंबडबाजारासह जुगार Reviewed by सह्याद्री चौफेर on October 28, 2024 Rating: 5
Powered by Blogger.