सह्याद्री चौफेर | वृतसंस्था
वणी : वणी विधानसभा मतदार संघात उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरु होती, काँग्रेस असो की शिवसेना अनेकांनी दिल्ली मुंबई वारी केली. मात्र, शिवसेना (उबाठा) च्या वतीने यादी जाहीर करून संजय देरकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचं वणीमध्ये ढोल ताशांच्या गजरासह जंगी स्वागत करण्यात आलं.
संजय देरकर आज मुंबईहून वणीला आल्यानंतर नंदेश्वर देवस्थान ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत समर्थक, कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शवली होती. यावेळी महाविकास आघाडी तसेंच शिवसैनिकांनी अतिशय उत्साहवर्धक व आत्मीयतेने भेट घेऊन त्यांचे शुभेच्छा सह अभिनंदन केले. निवडणुकीचा बिगुल वाजताच वणी विधानसभा मतदार संघात उमेदवारीवरून रण पेटले होते. मात्र, तरीही संजय देरकर यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरु होती. त्यानंतर महाविकास आघाडी तथा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे माझा नक्की विचार करतील, असा विश्वास संजय देरकर यांना बोलून दाखवला होता.
मुंबई वरून आल्याआल्याच संजय देरकर यांचं वणी मध्ये जंगी स्वागत करण्यात आले, यावेळी संजय देरकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेवून छञपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व. बाळासाहेब ठाकरे, संत जगन्नाथ महाराज, मुराद अली दर्गा, जय भिवसन देव या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नागरिकांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले.
महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील:
वणी विधानसभा मतदार संघाची उमेदवारी मला मिळाली, आनंदाची गोष्ट आहे. सर्वांचे आशीर्वादामुळे हे झाले. परंतु महाविकास आघाडी चा उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी निवडून येणार आहे. त्याच सोबत विदर्भात महाविकास आघाडी चे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास संजय देरकर यांनी व्यक्त केला.
संजय देरकर यांचं वणी मध्ये जंगी स्वागत, नागरिकांचे मानले आभार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 25, 2024
Rating: