हजारो समर्थकांच्या उपस्थितीत राजू उंबरकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : मनसे पक्ष नेते, ठाण्या वाघ, राजू उंबरकर यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत वणी मतदारसंघाकरिता आज (ता. 25) उमेदवारी अर्ज दाखल केला. 

यावेळी त्यांच्या सौभाग्यवती तृप्ती उंबरकर ह्या सुद्धा उपस्थित होत्या. भव्य मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राजू उंबरकर यांचे समर्थकांनी 'कामाचा माणूस' असे विजयाचे ब्रीदवाक्य लिहिलेल्या ओपन ट्रकमधून राजू उंबरकर यांनी नागरिकांना अभिवादन करत शहराच्या मुख्य मार्गाने निघाले.
या प्रसंगी वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील अर्चना बोदाडकर, माजी नगरसेवक नानू त्रिंबके, अलका टेकाम, निर्शाद खान, फाल्गुण गोहोकार, शंकर वरघट, रुपेश ढोके, चांद बहादे, गजानन मिलमीले, शुभम भोयर, अनिस सलाट, मयूर गेडाम, अजित शेख, तुषार गबराणी, उदय खिरटकर यांचेसह हजारों समर्थकांची उपस्थिती होती.
हजारो समर्थकांच्या उपस्थितीत राजू उंबरकर यांनी भरला उमेदवारी अर्ज हजारो समर्थकांच्या उपस्थितीत राजू उंबरकर यांनी भरला उमेदवारी अर्ज Reviewed by सह्याद्री चौफेर on October 25, 2024 Rating: 5
Powered by Blogger.