सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : मागील तीन वर्षापासून फरारीत आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता.खबर मिळाली,सापळा रचला अन् शिरपूर पोलिसांनी आरोपीताच्या मुसक्या आवळल्या आहे.
नौशाद शहादातुल्ला कुरेशी (34) रा. वार्ड क्र.2 घुग्गुस (जि.चंद्रपुर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. शिरपूर पोलीस ठाण्यात अप क्र.248/2021 कलम 399,402 भा.द.वी. सहकलम 4/25 शत्र अधिनियम गुन्हे दाखल आहे. गेल्या तीन वर्षापासून पोलिसांना हुलकवणी देणारा आरोपी नौशाद कुरेशी हा दि. 23 ऑक्टोबर रोजी पोलीस पथक गस्त घालत असताना घुग्गुस हद्दीत असल्याची खात्रीलायक माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली.
लगेच पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांनी पो.स्टे. चे पोउपनि रावसाहेब बुधवंत व पोलीस कर्मचाऱ्यांना वरील कारवाई कामी आदेशित केले असता त्यांनी क्षणाचा विलंब न करता नमुद ठिकाणी आरोपीचा शोध घेऊन त्यास जेरबंद केले व त्याचे नावाची पडताळणी करुन तो इसम नौशाद शहादातुल्ला कुरेशी रा. वार्ड क्र.2 घुग्गुस ता. जि. चंद्रपुर असल्याची खात्री पटल्याने त्यास ताब्यात घेऊन अटक केली.
सदर आरोपीतास दिनांक 24/10/2024 रोजी मा. सत्र न्यायालय केळापुर येथे हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीचा जेल वारंन्ट केल्याने आरोपीची यवतमाळ कारागृहात रवानगी केली.
ही कामगिरी कुमार चिंता पोलीस अधीक्षक, यवतमाळ, पियुष जगताप साहेब अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, गणेश किंन्द्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माधव शिंदे ठाणेदार पो.स्टे.शिरपुर, पोउपनि/रावसाहेब बुधवंत, पोहवा/ सुनिल दुबे, पोकॉ/ विनोद काकडे, पोकों/पंकज कुडमेथे यांनी पार पाडली आहे.
तीन वर्षांपासून फरारीत आरोपीच्या शिरपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 25, 2024
Rating: