आज जोरदार शक्तीप्रदर्शन! राजू उंबरकर करणार अर्ज दाखल

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : आज शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू मधुकरराव उंबरकर शक्तीप्रदर्शन करणार असून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे वणी मतदार संघांचे राजकारण चांगलेच रंगणार आहे.

काही महिन्यापूर्वी राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर केली होती, तेव्हापासूनच सर्व वणी मतदार संघातील कार्यकर्ते तयारीला लागले होते. त्या दिवसाची समर्थक आतुरतेने वाट पाहत होते. आज 25 ऑक्टोबर रोजी मनसेचे राजू उंबरकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील कार्यकर्ते पाण्याच्या टाकी जवळ हजारोच्या संख्येने गोळा होणार असून वणी मध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. 

राजू उंबरकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आज आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 
आज जोरदार शक्तीप्रदर्शन! राजू उंबरकर करणार अर्ज दाखल आज जोरदार शक्तीप्रदर्शन! राजू उंबरकर करणार अर्ज दाखल Reviewed by सह्याद्री चौफेर on October 25, 2024 Rating: 5
Powered by Blogger.