सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : येथील अन्न पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी यांना आज ७० हजार रुपयांची लाच घेतांना एसीबी (ACB) ने रंगेहाथ पकडले. ही कारवाई २४ ऑक्टोबर ला दुपारी ३ वाजता दरम्यान अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केल्याची माहिती आहे.
वणी तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले संतोष उईके यांनी रास्त धान्य दुकान बंडू देवाळकर रा. चिखलगाव यांना राशन दुकान संदर्भात सत्तर रुपयाची लाच मागितली याबाबत बंडू देवाळकर यांनी पुरवठा निरीक्षक संतोष उईके यांची ए सी बी (ACB) कडे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत आज सापळा रचला व अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी संतोष उईके यांना कार्यालयातच मागणी केलेल्या रकमेसह लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
पुढील कारवाईसाठी शासकीय विश्रामगृह येथे आणण्यात आले होते. या कार्यवाहीने तालुका प्रशासन चांगलेच खळबळले...
अन्न पुरवठा निरीक्षक अधिकारी ए सी बी (ACB) च्या जाळ्यात अडकला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 24, 2024
Rating: