सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : विधानसभेच्या तोंडावर विविध राजकीय घडामोडीला वेग आला. यातच आज प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत जिल्हा उप प्रमुख निलेश माहूरकर यांनी आपल्या समर्थकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दाखल झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते नेते राजु उंबरकर यांच्या हस्ते आज वणी येथील पक्ष कार्यालयात माहूरकर यांचा मनसेत पक्ष प्रवेश पार पडला. माहूरकर यांच्या पक्षप्रवेशनाने मनसेला बळ मिळाले असून आगामी विधानसभेत याचा फायदा पक्षाला होणारं असल्याचे बोलले जात आहे.
निलेश माहुरकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात अनेक सामाजिक आणि राजकीय उपक्रमासह विविध मुद्द्याला घेऊन आक्रमक स्वरूपाचे आंदोलने केली होती. तर नुकत्याच पार पडलेल्या बुटीबोरी नगर परिषदेमध्ये त्यांनी निवडणूक लढवून समाधानकारक मताधिक्य प्राप्त केले होते. तर कामगार क्षेत्रामध्ये विविध कंपन्यावर त्यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून पकड निर्माण केली असून नामांकित कंपन्यावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामगार संघटना उभ्या केल्या. आता या सर्वांचा फायदा मनसेच्या पदरात पडणार. माहूरकर यांनी आज अचानक मनसेत प्रवेश केल्याने विविध राजकिय चर्चांना उधाण आले. मनसेचे नेते राजु उंबरकर यांनी माहूरकर यांच्या गळ्यात पक्षाचा दुप्पटा टाकून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नागपुर जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर, बिजाराम किनकर ( हिंगणा मनसे उमेदवार) वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शिवराज पेचे, विलन बोदाडकर, अजित शेख, शुभम भोयर, मयूर गेडाम, संदिप वाघमारे, लक्की सोमकुंवर यांच्या सह नागपुर येथिल सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..
प्रहार मधून मनसेत जाहीर प्रवेश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 24, 2024
Rating: