सह्याद्री चौफेर | वृतसंस्था
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील खडकी फाट्यानजीक एका मोटारसायकलला विरुद्ध दिशेने येणाऱ्या बोलेरो वाहनाने धडक दिल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार तर, एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज बुधवार ला रात्री साडेसात वाजता राज्यमहामार्गांवर घडली.
शेतातून गावाकडे जाणाऱ्या बुरांडा शिवारात असलेल्या शेतातून दोघेजण मोटारसायकल ने राज्यमहामार्गाने खडकी गावाकडे निघाले. अशातच वणीवरून भरधाव येणाऱ्या बोलेरो वाहनाने खडकी फाट्या जवळ मोटारसायकल ला धडक दिली. यात खडकी (बु.) येथील हरी उर्फ रविंद्र दिगांबार अवताडे (वय ४५) हे जागीच ठार झाले तर, त्याचा सहकारी अतुल झिंगू उईके ( वय २७) हे गंभीर जखमी झाले.
बोलोरो वाहणाची दुचाकीला धडक, एक ठार एक गंभीर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 23, 2024
Rating: