सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेले काँग्रेस, उद्धवसेना या पक्षातून कोणत्या पक्षाला वणी विधानसभेची उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी वणी मतदारसंघातून संजय देरकर यांना अखेर उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच वणी येथे शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्याभऱ्यापासून वणीचा नाट्यमय तिढा कायम होता,येथील अनेकजन तिकीट मिळवण्यासाठी दिल्लीवारी तर मुंबईत तळ ठोकून होते.
वणी मतदारसंघातून महाविकास आघाडी,काँग्रेस पक्षासह अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी आपल्या पक्षश्रेष्ठीकडे रेटून प्रयत्न केला. त्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही मोठी रस्सीखेच चालू असल्याची चर्चा होती. रविवारी महायुतीची यादी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची वणी मतदार संघाची उमेदवारी कोणाला मिळेल! याची उत्कंठा वाढली होती, उद्धवसेनेचे संजय देरकर यांनी उमेदवारी मिळविण्यात अखेर यश मिळवले आहे. महाविकास आघाडी चे ८५-८५-८५ असा फार्मुला ठरला असून उर्वरित जागा मित्र पक्षांना. मात्र,वणीत कार्यकर्त्यांकडून श्री.देरकर यांचं अभिनंदनासह विजयश्रीचा वर्षाव केला जात आहे.
प्रचाराला कमी कालावधी असल्याने लवकरच आता प्रचाराची रणधुमाळी चालू होणार असून जनतेचा कल कोणाकडे राहणार, हे काही दिवसातच समजेल. आता मात्र, वणी विधानसभा ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा निवडणूक आखाडा रंगणार आहे.
वणीचा तिढा सुटला : विधानसभेची उमेदवारी शिवसेना 'उबाठा'कडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 23, 2024
Rating: