दहावीच्या परीक्षेत सर्वात मोठा बदल; आता विषयांत 35 ला नाही तर 20 ला पास

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. दहावीमध्ये काही विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे विषय अवघड जातात. त्यामुळे या विषयात नापास होण्याची संख्या देखील जास्त आहे. 

मात्र, आता दहावीच्या बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त गुण मिळाले तरी देखील अकरावीमध्ये प्रवेश घेता घेणार आहे.

 नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद देखील करण्यात आली आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांच्या रिझल्टवर एक विशिष्ट शेरा देण्यात येणार आहे. 

मात्र आता ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे विषय अवघड जात होते त्यांना बोर्डाच्या या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.


दहावीच्या परीक्षेत सर्वात मोठा बदल; आता विषयांत 35 ला नाही तर 20 ला पास दहावीच्या परीक्षेत सर्वात मोठा बदल; आता विषयांत 35 ला नाही तर 20 ला पास Reviewed by सह्याद्री चौफेर on October 23, 2024 Rating: 5
Powered by Blogger.