घरकुल लाभार्थी मोबदल्याच्या प्रतीक्षेत

सह्याद्री चौफेर । वृतसंस्था 

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या  ग्रामीण भागातील बहुतांश गावातील ग्रामपंचायत अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल बांधकाम सुरू आहे. काही प्रमाणात घराचे बांधकाम पूर्ण झाले असून आतापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात उरलेल्या हप्त्याचे रक्कम जमा न झाल्याने लाभार्थी ग्रामपंचायत सचिवाची संपर्क साधतात. त्यात त्यांना पंचायत समितीत जाण्याचे सल्ले मिळते. त्या अनुषंगाने लाभार्थी समितीमध्ये चकरा मारताना दिसून येत, आहे. त्यात संबंधित विभागाचे अधिकारी गैरहजर असल्यामुळे लाभार्थ्यांना माहिती न मिळता परत यावे लागतात त्यामुळे कुठेतरी शासनाचा या योजनेमागील, लाभार्थ्यांना बाकी उरलेल्या रकमेसाठी कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. हे प्रकार सर्रास दिसून येत आहे. त्यात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे गरीब व गरजू लाभार्थ्यांवर एक प्रकारे अन्याय होत असल्याचे वाटते, शासनाच्या या चुकीचा धोरणामुळे ग्रामीण भागातील गरीब व गरजू लाभार्थ्यांना घरकुलाच्या उरलेल्या रकमेपासून वंचित तर ठेवणार नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात बाकी उरलेल्या रक्कम तत्काळ जमा करावे अशी मागणी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांकडून होत आहे.
घरकुल लाभार्थी मोबदल्याच्या प्रतीक्षेत घरकुल लाभार्थी मोबदल्याच्या प्रतीक्षेत Reviewed by सह्याद्री चौफेर on October 16, 2024 Rating: 5
Powered by Blogger.