संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : वणी उपविभागातील समस्या, शहरातील विविध प्रश्न, शेतक-यांचे विविध प्रश्नांना घेऊन 15 ऑक्टोबर रोजी कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर दुपारी 2 वाजता शेकडो आंदोलकांनी संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. खाडे यांनी उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा केली.

निराधार लाभार्थ्यांचे रखडलेले पैसे त्वरित जमा करावेत. कापसासाठी रुपये 10000 व सोयाबीनसाठी रुपये 9000 भाव द्यावा. घरकुल योजनेचे प्रलंबित हफ्ते तत्काळ जमा करण्यात यावेत. वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या नुकसानीचे दावे त्वरित मंजूर करावेत. जंगली जनावरांच्या समस्येचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्यात यावा, जंगल आणि शेतकऱ्यांच्या शेतांभोवती पक्के कंपाऊंड बांधले जावे, जंगली जनावरांमुळे होणारे नुकसान पिक विमा योजनेत समाविष्ट करावे. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास नियमित वीज पुरवठा करावा. पीक विम्याचे प्रलंबित दावे त्वरित मार्गी लावावेत. शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी. PM किसान सन्मान निधी योजने मध्ये 2019 नंतर सातबारावर फेरफार झालेल्या शेतकऱ्यांना अपात्र करण्याची अट रद्द करावी. वणी शहरात स्वच्छ पाण्याचा पुरवठा, गटारींची नियमित साफसफाई, आणि रोगराई नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात. इ. मागणीचे निवेदन देण्यात आले.

त्यानंतर कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक Reviewed by सह्याद्री चौफेर on October 16, 2024 Rating: 5
Powered by Blogger.