वणीकरांची धाकधूक वाढली : हाच उमेदवार, अजूनही निश्चित नाहीच..!

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : चंद्रपूर लोकसभेत काँग्रेसचा खासदार निवडून आल्याने वणी विधानसभेत आमदार काँग्रेसचाच, असं म्हणत दावा करण्यास सुरुवात केली. पण हरयाणात काँग्रेसला दणका बसला. सगळे सर्व्हे पक्षाच्या बाजूनं असूनही भाजपनं सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. त्यानंतर काँग्रेस काहीशी बॅकफूटवर आलेली आहे. महाराष्ट्रात त्यातही वणी विधानसभेची वाट जरा खडतर आहेत.

आज सोशल माध्यमातून एक टेक्स्ट (text) मॅसेज वायरल झाला. त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा, व कुठली जागा मिळाली,असा लांबलचक मॅसेज होता. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील वणी "काँग्रेस" असा उल्लेख असलेले पहायला मिळाले. झपाट्याने वायरल झालेल्या या मॅसेजने वणीचे राजकीय वातावरण चांगलेच गोंधळ माजवल्याचे दिसून आले. यादरम्यान अनेकांचे अनेकांना फोन खणखणले, मॅसेज वर मॅसेज फॉरवर्ड होऊ लागले. त्यानंतर कुठे आनंद तर कुठे नाराजीही दिसून येत होती. मात्र, खरं काय आहे? हे नेमकं कुणालाही काहीच सांगता येत नव्हते. संभ्रम निर्माण करणारे दोन वेगवेगळ्या पद्धतीचे मॅसेज वायरल झाल्याने यात काही तथ्य नाही म्हणत कार्यकर्त्यांनी तूर्तास सुटकेचा निःश्वास घेतला. मात्र, उमेदवाराच्या उमेदी वर पाणी फेरले अशी काहींची अवस्था झाली होती.

वणी विधानसभा ही शिवसेना (उबाठा) कडे असल्याचे ठामपणे शतप्रतिशत आजही बोलल्या जात आहे. मात्र,उमेदवारी कोणाच्या पत्यावर आहे, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. आज दुपारी निवडणूक आयोगाकडून राज्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून वणीत मात्र उमेदवारीवरून धाकधूक आहे. हाच उमेदवार म्हणून अजून तरी निश्चित नाहीच..!
वणीकरांची धाकधूक वाढली : हाच उमेदवार, अजूनही निश्चित नाहीच..! वणीकरांची धाकधूक वाढली : हाच उमेदवार, अजूनही निश्चित नाहीच..! Reviewed by सह्याद्री चौफेर on October 15, 2024 Rating: 5
Powered by Blogger.