सह्याद्री चौफेर | वृतसंस्था
वणी : तालुक्यातील नायगांव (खु.) येथील शेतकऱ्यांच्या वतीने वनविभागाच्या विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन दि.१० ऑक्टोबर पासून तहसील कार्यालयाच्या समोर सुरु करण्यात आले होते. आज या ठिय्या आंदोलनाचा सहावा दिवस होता. पाच दिवस उलटून देखील कोणी आंदोलन कर्त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांचा लढा सुरूच होता.
शेतकऱ्यांचे आंदोलन सलग पाच दिवसापासून गावात सुरु असल्याचे समजताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आज मंगळवारी दुपारी 5 वा. आंदोलनस्थळी भेट दिली व संबंधित विभागाशी भ्रमणध्वनी वरून चर्चा करून आंदोलन कर्त्यांना आश्वासित केले. दरम्यान,निवडणूका संपल्यावर पुन्हा हे आंदोलन सुरु करण्यास काही हरकत नाही असेही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार यांचा मान ठेवून हे आंदोलन तूर्तास मागे घेतले. चर्चेनंतर आंदोलनास सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींनी आमदार बोदकुरवार यांचा खरपूस समाचारही घेतल्याचं पहायला मिळाले होतं.
आमदार यांनी पुढाकार घेऊन निवडणुकानंतर नवीन सरकार ला विनंती करून आपल्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करू या त्यांच्या लिखित विनंती ला मान देऊन अखेर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले. यावेळी अनिल घाटे यांनी आंदोलनास मार्गदर्शन करताना म्हणाले, समस्या काही सुटली नाही आहे तशीच आहे. हा लढा शेतकऱ्यांनी उभारल्याने तुम्हा शेतकऱ्यांचं कौतुक करावे तितकं कमीच आहे. निवडणूका झाल्या कि, आपण कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांचा पाठिंबा न घेता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभारलेले पाहिलं आंदोलन तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणखी हे आंदोलन राज्यभर उभारू असेही सांगितले.
यावेळी नायगाव (खू.) गावातील शेतकरी महिला, पुरुष मोठया संख्येने या बेमुदत ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या काय होत्या मागण्या :
२०२३-२४ पिकाची नुकसान भरपाई, जंगली जनावराचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, जंगलभागाला पक्के कम्पाऊंड करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेती ला पक्के कम्पाऊंड द्यावे, जंगली जनावरांची नुकसान भरपाई पिक विम्यामध्ये समाविष्ट करावी अशा शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या.
अखेर आमदाराच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन मागे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 15, 2024
Rating: