आजी माजी सरपंचाचा भाजपामध्ये प्रवेश


सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

मारेगाव : नुकतेच हरियाणा च्या अभूतपूर्व विजयानंतर महाराष्ट्रात जनतेचा ओढा भारतीय जनता पक्षाकडे  वाढल्याचे दिसून येत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मारेगाव तालुक्यातील आजीमाजी सरपंचांनी भाजपात पक्ष प्रवेश घेतल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का तंत्र असल्याचे बोलल्या जात आहे. 
वणी विधानसभा मतदार संघांचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार,यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सरपंच रामचंद्र जवादे खैरगाव दापोरा, व माजी सरपंच पांडुरंग ननावरे कोसारा, महादेव रावजी बनकर, अनिल पुरी, विजय महाजन, योगेश चांभारे, विनोद रूयारकार, प्रकाशराव खडसे, वैभव चव्हाण, गजानन झोटिंग, पांडुरंग चांभारे, दिलीप दिनकर, देऊजी पचारे, पांडुरंग भाऊ यासह महिला पुरुषांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशाचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 
या प्रसंगी आमदार बोदकुरवार म्हणाले, हरियाणा मध्ये कमळ फुलले,भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा राज्य राखून इतिहास रचला आहे. भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिल्याबद्दल" हरियाणातील जनतेचे आभार व्यक्त करत आता महाराष्ट्रातही कमळ फुलेल, असेही ते म्हणाले. दरम्यान सर्व मान्यवरांचं आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपाचे पदाधिकारी सुभाष खडसे, सरपंचा छाया खाडे, सरपंच अभिजित मांडेकर, तसेच कार्यकर्ते व गावातील बहुसंख्येने महिला पुरुष उपस्थित होते. 


आजी माजी सरपंचाचा भाजपामध्ये प्रवेश आजी माजी सरपंचाचा भाजपामध्ये प्रवेश Reviewed by सह्याद्री चौफेर on October 15, 2024 Rating: 5
Powered by Blogger.