शीलाताई बिलोरिया यांचं निधन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शीला बिलोरिया यांचं निधन झाल्याचं वृत्त नुकतंच हाती येतंय. गेल्या काही महिन्यापासून त्या आजारी होत्या. प्रकृती अस्वस्थतेच्या कारणामुळे त्यांचेवर दिल्ली येथे उपचार सुरू होते, उपचारादरम्यान आज शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. मृत्यूसमयी त्या ६१ वर्षांच्या होत्या. शीलाताई बिलोरिया ह्या शहरातील प्रसिद्ध व्यापारी तथा क्षत्रिय छिपा समाजाचे अध्यक्ष राजाभाऊ बिलोरिया यांच्या त्या पत्नी होत. त्यांचं पार्थिव त्यांच्या वणी स्थित निवासस्थानी आणण्यात येइल. रविवारी उद्याच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, दोन, स्नुषा व नातवंड असा बराच आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने शहरात शोककळा पसरली.
शीलाताई बिलोरिया यांचं निधन शीलाताई बिलोरिया यांचं निधन Reviewed by सह्याद्री चौफेर on October 12, 2024 Rating: 5
Powered by Blogger.