मारेगावकरांनी ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : निखळ मानवता, सच्चे राष्ट्रप्रेम आणि उच्च कोटीची उद्योजकता यांचा दुर्मीळ मिलाफ अमुल्य असे रत्न म्हणता येईल असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनाने एक महान उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्वाने आज जगाचा निरोप घेतला आहे. भारतीयांच्या मनातील अढळ मानबिंदू अस्ताला जाणे धक्कादायक आहे. ठाणेदार संजय सोळंके, पं. स. गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे, सीईओ बाबर यांच्या प्रमुख उपस्थित दिवंगत टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, महिला तालुका अध्यक्ष उज्वला चंदनखेडे, मारेगाव शहर अध्यक्ष चांद बहादे, नगरसेवक अंजुम शेख नबी, आकाश खामकर, निखिल मेहता, नबी शेख, जमीर सय्यद यासह तमाम मारेगावकर उपस्थित होते.

भारतासाठी आणि साहजिकच महाराष्ट्रासाठी ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचे निधन अपरिमित अशी हानी आहे. अशा या महान भारत सुपुत्राला मारेगावकरांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिवंगत टाटा यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वव चरणी प्रार्थना सर्वांनी केली.
मारेगावकरांनी ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली मारेगावकरांनी ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली Reviewed by सह्याद्री चौफेर on October 12, 2024 Rating: 5
Powered by Blogger.