सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : विधान सभेच्या निवडणूकीचे बिगूल वाजायला लागण्याची चिन्हे आता अगदी जवळच असुन संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या कार्यकर्त्याकडून जोरदार मोर्चबांधणी सूरू असून बोदकुरवार यांना परत आमदार करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एका बैठकीत भाजप कार्यकर्त्यांकडून वणी विधानसभेकरिता उमेदवाराबाबत मते जाणून घेतली. त्या बंद लिफाफ्यातून उमेदवार आमदार कोण? असणार ते आता "बंद लिफाफा" उघडल्यानंतर ठरवणार आहे. या अधिकृत घोषणेकडे जनतेचे लागून असताना वणी विधानसभा मतदार संघांचे उमेदवार संजीव रेड्डी बोदकुरवार फिक्स आहे,अशी चर्चा जोर धरत आहे.
वणी मतदार संघात संजीव रेड्डी बोदकुरवार यांची अल्पावधीतच ओळख कर्तव्यदक्ष, विकासपुरुष म्हणून आहे. त्याची हि ओळख त्यांना यश देणार असुन त्यांचा साधेपणा व ते मतदार संघात करत असलेले कार्य विरोधकांवर भारी पडणार असल्याने किती हि रान ऊठवले तरी, बाजी संजीव रेड्डी बोदकुरवारच मारणार असे बोलल्या जात आहे. मतदार संघातील वास्तव्य असल्याने त्यांना मतदार संघातील अनेक समस्या माहीत आहे. आपल्या कार्याच्या जोरावर त्यानी मतदार संघात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कोणताही आव न आणता साधे पणाने लोकांसमोर जाणे, त्याचे सोबत बसणे चर्चा करणे आणि जागच्या जागी प्रश्न सोडविणे असे त्यांच्या कार्याची पद्धत आहे. जी लोकांना ही पटत आहे. त्या मुळेच संजीव रेड्डी बोदकुरवार पुन्हा आमदार बनण्याशाठी कारणीभूत असून कार्यकर्ते हि सज्ज असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होत आहे.
बोदकुरवार यांनी मतदार संघातील अनेक काम केली आहे, जे सत्तर वर्षाच्या काळात कधीच होऊ शकले नाही ते या दहा वर्षात शक्य झाले. रस्ते, पाणी, घरकुल, आरोग्य शिबीर, बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार मेळावे घेतले. कोट्यावधींचा निधी मतदार संघांसाठी खेचून आणला. विशेष उल्लेखनीय की, अल्पावधीत झालेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी मतदार संघात तालुक्याच्या ठिकाणी मोफत ऑनलाईन केंद्र सुरू करून माता भगिनींना मोठा दिलासा दिला. तसेच नागरिकाच्या होणाऱ्या हालअपेष्टा लोकं दरबारी जाऊन जागच्या जागीच सोडवितात म्हणून नागरीक देखील त्याच्या कडे आशेने ने पहात असल्याचे दिसून येत आहे.
वणी विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे आमदार हेच उमेदवार संजीव रेड्डी बोदकुरवार परत विजयी होणार हि दगडावरची रेष असल्याचे कार्यकर्त्यातून बोलल्या जात आहे. मात्र, तो बंद लिफाफा कोणाचं नशीब उघडतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
बोदकुरवार यांना परत आमदार बनविण्यासाठी कार्यकर्ते सज्ज
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 12, 2024
Rating: