सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : येथील जैताई मंदिरात नवरात्री उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन दि. 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी करण्यात आले. या मध्ये स्थानिक कलावंताचे नृत्य पाहून रसिक भारावले होते.
यात धार्मिक गीतांवर आधारित नृत्य सागर झेप बहुउद्देशीय संस्था व संस्कार भारतीच्या वतीने सादरीकरण केले. नृत्य सादर करणाऱ्यांचा भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वणी शहरात असे उत्कृष्ट कलावंत नृत्य सादर करतात याबाबत त्यांनी सर्वांचे भरभरून कौतुक केलं.
यात स्पृहा कोरडे, प्रियांका कोटनाके, आरोही खैरे, गायत्री लुथडे, दृष्टी लुथडे, गौरव नायनवार, प्रियांशी, आरोही पंडलवार, स्वरा शेंडे, अदिती ढूमे, ओवि रोगे, स्वरा टेकाम, आराध्या भोसले, रिद्धी राऊत, सेजल यांनी शास्त्रीय नृत्य व लोकनृत्याद्वारे देवीची विविध रूपे नृत्य सादर केली. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाविक भक्त व कलावंत उपस्थित होते.
स्थानिक कलावंताचे नृत्य पाहून रसिक भारावले...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 10, 2024
Rating: