मारेगाव: कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभाग यांच्या द्वारे वन्यजीव सप्ताह साजरा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील प्राणिशास्त्र विभागाने दि. ०२ ऑक्टोंबर ते ०७ ऑक्टोबर, २०२४ दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला, ज्यामध्ये जैवविविधता आणि वन्यजीव संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी शैक्षणिक आणि संवादात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सप्ताहा दरम्यान साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. याप्रसंगी प्राणिशास्ञ अभ्यास मंडळाचे गठण करण्यात आले व व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. परेश पटेल, सहयोगी प्राध्यापक, लो. टी. महा. वणी हे होते. तर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव चे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे अध्यक्षीय स्थानी होते. या प्रसंगी व्यासपीठावर प्रा. डॉ. विनोद चव्हाण, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख तसेच प्रा. डॉ. नविन शर्मा, प्राणीशास्त्र विभागप्रमुख यांची प्रामुख्याने उपस्तिथी होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रा. डॉ.नविन शर्मा यांनी प्रास्तविकेद्वारे वन्यजिव सप्ताहाचे महत्व व वनपरिसंस्था हा विषय किती महत्वाचा आहे, हे पटवून दिले.

प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. परेश पटेल लो. टी. महा. वणी यांनी वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व आणि नष्ट होत चाललेल्या प्रजातींचे संरक्षण यावर सखोल मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले, “वन्यजीव हे आपल्या परिसंस्थेचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचे रक्षण करणे ही केवळ नैतिक जबाबदारी नसून आपल्या अस्तित्वासाठी देखील आवश्यक आहे” याची जाणीव करून दिली. त्यानंतर प्रा. डॉ. विनोद चव्हाण यांनी पर्यावरण संवर्धनाचे धोरणे आणि मानवी हस्तक्षेप कमी करण्याचे मार्ग याबद्दल माहिती दिली. याव्यतिरिक्त, वन्यजीव पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व मोठया प्रमाणात सहभाग दिसून आला, ज्यामध्ये वन्यजीवांचे संवर्धन या विषयावर विविध पोस्टर सादर करण्यात आली होती. या स्पर्धेत कु. आलीय शेख प्रथम, कु. वैष्णवी धासले व्दितीय व कु. भाग्यश्री मांजरे हिला तृतीय पारितोषिक मिळाले. 

तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी आपल्या अध्यशीय भाषणातून प्राणीशास्त्र विभागाला शुभेच्छा देत म्हणाले “हा कार्यक्रम केवळ शैक्षणिकच नव्हे तर सर्व जीवसृष्टीच्या परस्पर संबंधाची जाणीव करून देणारा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वन्यजीव आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळते”. असे कार्येक्रम वारंमवार शाळा महविद्यालयांमध्ये व्हावे. अशा उपक्रमातून वनस्पती, प्राणी, पक्षी यांचे संवर्धन होतेच पण यातून मानवाची सुध्दा उन्नती होते व आपल्या वन्यजीव वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडते. वनस्पती, प्राणी, पक्षी मनुष्य यांचे जीवनक्रम एकमेकावर अवलंबून आहे. याची जाण ठेवून आणि सामाजिक बांधिलकी जपून याचे संवर्धन केले पाहिजे असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. 

या कार्यक्रमाचे संचालन कु. हर्षदा देठे व कु. वैष्णवी ढासले तर आभार कु. प्रांजली अलाम बि. एस्सी भाग ३ यांनी केले. सदर वन्यजीव कार्यक्रम यशस्वी आयोजनाकरिता विभागप्रमुख डॉ. नविन शर्मा, प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे प्रभारी प्रा. डॉ. सुधीर चिरडे, प्रा. कुणाल गेडाम, अभिजित पंढरपुरे तसेच इतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.
मारेगाव: कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभाग यांच्या द्वारे वन्यजीव सप्ताह साजरा मारेगाव: कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभाग यांच्या द्वारे वन्यजीव सप्ताह साजरा Reviewed by सह्याद्री चौफेर on October 10, 2024 Rating: 5
Powered by Blogger.