बाल लैंगिकशोषण प्रतिबंध करण्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण मोहीम मारेगाव येथे संपन्न

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

मारेगाव : मुल आणि मुलांची अधिकार बाल शोषण बाललैंगिक अत्याचार त्यासोबत पोक्सो कायदा इत्यादी बाबत मार्गदर्शन व चर्चा स्थानिक महाकुलकर कॉम्प्लेक्स या ठिकाणी पार पडले. 

या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करण्यासाठी अर्पण संस्थेचे तज्ञ प्रशिक्षक अशा खाडकर, संगीता शिंदे, योगेश जावळे, शंकर गवस इत्यादी तज्ञ यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. पंचायत समितीचे प्रशिक्षण समन्वयक निलेश आत्राम पंचायत समिती मारेगाव यांनी आपले मोलाचे योगदान देऊन संपूर्ण प्रशिक्षणाला हातभार लावला त्याचप्रमाणे प्रशिक्षणाची संपूर्ण व्यवस्था तत्पर त्यांनी पार पाडले. 

या प्रशिक्षण कार्यक्रमाला तालुक्यातील शिक्षक एक ते आठ अध्यापन करणारे 240 शिक्षक प्रशिक्षणाला उपस्थित होते. हा कार्यक्रम सफल करण्यासाठी मोलाचे योगदान सेवक नरांजे, आशिष चव्हाण, समता मेश्राम, निलिमा पाटील, बेबी घुमकर, संतोष खेवले इत्यादींनी परिश्रम घेऊन दोन दिवसीय प्रशिक्षण मोहीम राबवून मोलाचे सहकार्य केले.
बाल लैंगिकशोषण प्रतिबंध करण्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण मोहीम मारेगाव येथे संपन्न बाल लैंगिकशोषण प्रतिबंध करण्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण मोहीम मारेगाव येथे संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on October 18, 2024 Rating: 5
Powered by Blogger.