सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील अनुसूचित क्षेत्र असलेले (पेसा) नरसाळा येथे लंकापती महात्मा राजा रावण यांच्या स्मृतिदिनी पूजा आयोजन करण्यात आले होते, दि. 12 ऑक्टोबर सायंकाळी 7:30 ला पूजन व अभिवादन करून संपन्न झाली.
या गोंगो रावण पूजेला आदिवासी जनजागृती युवा संघटनेचे अध्यक्ष. मा. लक्ष्मण भाऊ कनाके यांनी गोंगो रावण पूजेचे महत्व समजावून सांगितले. त्यावेळी सर्व आदिवासी समाज बांधव व महिला यांना सांगितले की, समाजामध्ये रावण दहन प्रथा बंद करा. लंकापती महात्मा राजा रावण हे आपले आराध्य दैवत आहे. त्यामुळे ही दहन प्रथा बंद करा. असे आदिवासी समाजाला त्यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले.
या स्मृतिदिनी संघटनेचे उपाध्यक्ष. ज्ञानेश्वर दडांजे, किशोर सुरपाम, धनंजय तोडासे, रुपेश दडांजे, विकास मरस्कोल्ले, महेंद्र उईके, भारत सोयाम, आदी महिला व युवक युवती आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नरसाळा येथे गोंगो रावण पेनता पूजन संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 14, 2024
Rating: