सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : वणी विधानसभा मतदारसंघासाठी संजय देरकर यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उबाठा मधून मंगळवारी (दि.२९) जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी वणी, मारेगाव, झरी-जामणी तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
यावेळी काँग्रेस चे नेते वामनराव कासावार, खा. संजय देशमुख (यवतमाळ वासीम), शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजय नगराळे, संजय निखाडे, सुनील कातकडे, दीपक कोकास, काँग्रेस च्या अरुणाताई खंडाळकर, महिला जिल्हा संघटिका डीमनताई टोंगे, साधनाताई गौरकार, टिकाराम कोंगरे, घनश्याम पावडे, मारोती गौरकार,आशिष खुलसंगे, राजेश कासावार, सुधीर थेरे, अजिंक्य शेंडे, यांच्यासह महाविकास आघाडीचे बडे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच ग्रामीण भागातून आलेला जनाधार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
संजय देरकर यांच्या उमेदवारीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे हजारो कार्यकतें स्थानिक जत्रा मैदान येथे उपस्थित होते. दरम्यान संजय देरकर यांनी रंगनाथ स्वामी मंदिर, भगत सिंग चौक, गांधी चौक, खाती चौक, छत्रपती शिवाजी महाराज, अशी रॅली जोरदार शक्तीप्रदर्शन व नागरिकांना अभिवादन करत शासकीय मैदान पाण्याची टाकी जवळ सभेत रूपांतर झाले. तत्पूर्वी शहरात अलोट गर्दी उसळली होती. जिकडे तिकडे महाविकास आघाडी चे झेंडे, दिसत असल्याचे चित्र पहायला मिळाली.
यानंतर निवडणूक अधिका-यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काढण्यात आलेल्या समर्थन रॅलीत मतदारसंघातील महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी एकच चर्चा ऐकायला मिळत होती ती म्हणजे काल पेक्षा आज तीनपट पब्लिक होती.
प्रचंड गर्दीच्या साक्षीने संजय देरकर यांची उमेदवारी अर्ज दाखल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 29, 2024
Rating: