नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की यांच्या निवासस्थानी खा. संजय देशमुख भेट

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

मारेगाव : येथील नगरपंचायत चे नगराध्यक्ष डॉ मनिष मस्की यांच्या निवासस्थानी यवतमाळ वाशीम लोकसभा क्षेत्राचे खा. संजय देशमुख यांनी भेट देऊन होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीचा आढावा घेण्यात आला. 

या बैठकीला महाविकास आघाडी चे उमेदवार संजय देरकर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्रजी गायकवाड, शिवसेना (उबाठा) चे सुनील कातकडे, युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल धोपेकर, सौ.नेहा मनीष मस्की, मयूर ठाकरे, गणेश आसुटकर, रवी कुचनकर, लक्ष्मीकांत देठे, पंकज नेहारे, अतुल मस्की, अमोल झोटिंग आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

मारेगाव तालुक्यातील शिवसैनिक डॉ. मनिष मस्की यांच्या घरी यवतमाळ वासिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख यांनी दि. 27 ऑक्टोबर रोजी दुपारी सदिच्छा भेट दिली. यामुळे या बैठकीकडे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या, नेमकं काय होणार राजकीय घडामोडी घडणार यावर तालुका वासियांचे लक्ष वेधले असताना संजय देशमुख यांनी महाविकास आघाडी चे उमेदवार संजय देशमुख यांच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहून त्यांना विधानसभेत भरघोस मताने निवडणूक पाठवायचे आहे अशा सूचना दिल्याचे माहिती आहे. खासदार संजय देशमुख हे वणी विधानसभेच्या दौऱ्यावर होते, यावेळी यांनी डॉ मनिष मस्की यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, यावेळी सौं नेहा मनिष मस्की यांनी त्यांचं शाल व श्रीफळ देऊन सत्कार व स्वागत केले. 

दरम्यान, या सदिच्छा भेटीत वणी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने दहा ते पंधरा कार्यकर्त्यासोबत महत्वाच्या विषयावर चर्चा केली असे डॉ मस्की यांनी सांगितले. यावेळी मारेगाव तालुक्यातील उद्धवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. 
नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की यांच्या निवासस्थानी खा. संजय देशमुख भेट नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की यांच्या निवासस्थानी खा. संजय देशमुख भेट  Reviewed by सह्याद्री चौफेर on October 29, 2024 Rating: 5
Powered by Blogger.