संजय खाडेंना विधानसभेची तिकीट मिळाली नाही तर, सांगलीचा "विशाल पाटील" पॅटर्न राबविणार का?

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

वणी : शिवसेना (उबाठा) ला वणी मतदार संघाची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. यामुळे काँग्रेस मध्ये नाराजी चा सूर असून संजय खाडे हे सांगलीचा विशाल पाटील पॅटर्न राबविणार का? यावर मतदार संघात विविधांगी चर्चा होत आहे. 

मागील काही दिवसापासून उमेदवारी वरून वणी मतदार संघात नाट्य सुरु आहे. भाजपा ने उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडी चा कोण असणार याकडे जनतेचे लक्ष लागले होते. दरम्यान, संजय खाडे हेच काँग्रेस चे उमेदवार असणार अशी चर्चा वणी विधानसभा क्षेत्रात होती. संजय खाडे यांच्या जनहितार्थ उपक्रमाने नागरिकही त्यांच्या कडे नवा चेहरा या अपेक्षेने पाहत होती. तिकडे निवडणुकीचा बिगुल वाजला आणि वणी विधानसभा मतदार संघातील पक्षाचे कार्यकर्ते बुलेट ट्रेन सारखे दिल्ली तर कधी मुंबई सुसाट पळू लागले. इकडे महाविकास आघाडी चा उमेदवार संजय खाडे हेच असतील म्हणून समर्थक काँग्रेसचे स्टेशन पकडून बसली होती, मात्र ऐन वेळेवर शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर करून राजकीय वादळ उठले. महाविकास आघाडी च्या वरिष्ठांच्या वतीने नाराजी होऊ लागली. त्यामुळे आघाडीचा तिढा वाढला जो आजही कायम दिसत असून '90' चा फार्मुला ठरला असला तरी काँग्रेस चा वणी साठी असलेला दावा शिवसेना (उबाठा) ने उधळून लावत काही उमेदवार जाहीर केले. यात वणी ची उमेदवारी संजय देरकर यांना मिळाल्याने आणखीनच काँग्रेस च्या जिव्हारी लागल्याने वणीच्या राजकारणात चांगलाच गोंधळ उडाला आहे. 

वसंत जिनिंग चे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी एका वृत्त वहिनीला बोलताना सांगितलं की, वरिष्ठाना विश्वासात न घेता उमेदवार जाहीर केली. जेव्हा उमेदवार आम्हाला भेटायला आले तेव्हा आम्ही अस्वस्थ झालो असेही त्यांनी म्हटलं आहे. आज उबाठा ला उमेदवारी मिळाली त्याबाबत आम्ही सहमत नाही,ती उमेदवारी काँग्रेस ला असायला पाहिजे होती. वणी काँग्रेस चा बालेकिल्ला असून काँग्रेसचे भक्कम मतदान आहे, महाविकास आघाडी ची निवडून येणारी शीट आहे. त्यामुळे वणी मतदार संघाची उमेदवारी ही काँग्रेस मिळायची पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे वणीतून काँग्रेस उमेदवार नसल्यास बंडखोरीचे संकेत दिसून येत आहे. काँग्रेस चे संजय खाडे हे "सांगलीचा विशाल पाटील" पॅटर्न राबविणार अशी महिती 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना खुद खाडेंनी दिली आहे. त्यामुळे संजय खाडे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास वणी विधानसभेची लढत ही चौरंगी होईल असे बोलले जात आहे.

वणीत सांगली पॅटर्न राबवणार

गेल्या दोन वर्षांपासून मी मतदारसंघ पिंजून काढला आहे. वणी विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसचाच बालेकिल्ला होता. व काँग्रेसचाच या जागेवर दावा होता. मात्र ही जागा शिवसेना (उबाठा) च्या वाटेला गेली. यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच व त्यांच्या आग्रहास्तव मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

 - संजय खाडे


संजय खाडेंना विधानसभेची तिकीट मिळाली नाही तर, सांगलीचा "विशाल पाटील" पॅटर्न राबविणार का? संजय खाडेंना विधानसभेची तिकीट मिळाली नाही तर, सांगलीचा "विशाल पाटील" पॅटर्न राबविणार का? Reviewed by सह्याद्री चौफेर on October 28, 2024 Rating: 5
Powered by Blogger.