घोंसा येथे मोफत नेत्र चिकित्सा, मोती बिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : अंधाचे जगणे वेदनादायी असते, यात थोडा जरी मायेचा पाझर दिसला तरी त्यांच्या मनात माया दाटून येते. भाजपाचे कार्यकारिणी सदस्य व स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन,अध्यक्ष तथा युवा उद्योजक तथा दानशूर व्यक्तीमत्व विजय चोरडिया यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन वणी व इंडियन रेड क्रॉस सोसायटी सब डिस्ट्रिक ब्रँच वणी यांच्या संयुक्त विद्यमाने मा. विजय चोरडिया यांच्या वाढदिवस निमित्ताने मोफत नेत्र चिकित्सा, मोती बिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर, कस्तुरबा हॉस्पिटल, सेवाग्राम व चोरडिया हॉस्पिटल, वणी यांचे संयुक्त विद्यमाने आज (ता.१) सप्टेंबर ला स्थानिक संत गजानन महाराज मंदिर, घोंसा येथे पार पडला.
येथील हजारोंच्या संख्येने उपस्थित दिव्यांग, जेष्ठ नागरिक व गरजू बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता. या शिबिराचे आयोजक अध्यक्ष योगेश चिंडालिया, गोविंदा ढोरके सचिव तथा प्रोजेक्ट डायरेक्टर व डॉ.रोहित चोरडिया, चोरडिया हॉस्पिटल, वणी व पत्रकार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, अंध, दिव्यांगाची सेवा करणे म्हणजे ईश्वर सेवांची प्राप्ती. मनाला समाधान देते व दृष्टीहीन बांधवांच्या चेहऱ्यावरील हास्य नेहमी सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा देते. व याच प्रेरणेतून मागील ३० वर्षापासून स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन च्या वतीने विविध गरजू रुग्णांना भोजन व मोफत आरोग्य सेवेची सोय केली आहे. या सर्व अंध बांधवांना आत्मनिर्भर करून समाजाच्या मुख्य प्रवाहात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी व जीवन सुधारण्यासाठी आपण सक्षम आहोत,अशी ग्वाही अध्यक्ष विजय चोरडिया यांनी दिली. यासाठी विविध ठिकाणाहून उपस्थित डॉ. अमोल पंडित,डॉ. शेषराव कोठारे, डॉ. नितेश कुमार, डॉ. प्रांजल जैन, डॉ. पवन तळवी, डॉ. अक्षय ठाकूर, डॉ. पुणेकर, या तज्ञांनी वैद्यकीय सेवा दिली. सोशल वर्कर काटकर, सचिव ताकसाडे आदींनी शिबिराचे काम पाहले.
या शिबिरात मोफत औषधी, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन, व ऑपरेशन करिता रुग्णांना सेवाग्राम येथे नेण्यासाठी मोफत व्यवस्था करण्यात आली होती.
तपासणी केल्यानंतर आवश्यक सर्व रुग्णांना चष्मे मोफत देण्यात येणार आहे. दरम्यान, नोंदणी न झालेल्या रुग्णांचीही वेळेवर नोंदणी करुन तपासणी करण्यात आली अणि आरोग्य शिबिरामध्ये बि.पी, शुगर तपासणी सुद्धा केली आहे. या शिबिराच्या यशस्वीतेकरीता घोन्सा येथील श्री गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त, कस्तुरबा हॉस्पिटल, सेवाग्रामची टीम, स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन वणीची टीम, इंडियन रेडक्रॉस सोसायटी उपजिल्हा शाखा, वणी व चोरडिया हॉस्पिटल वणीची चमू तसेच विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, विजयबाबू चोरडिया मित्र परिवार यांनी अथक मेहनत घेतली.
भव्य तान्हा पोळा उत्सव 2024समाजसेवी विजय चोरडिया यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने ३ सप्टेंबर रोजी वणी शहरातील नगर परिषद शाळा क्र. ५ जवळ, तान्हा पोळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना उत्कृष्ट बक्षीस देण्यात येणार आहे. या प्रसंगी बक्षीसांचा पाऊस पडणार असल्याचे म्हटलं जात आहे. यात भव्य लकी ड्रॉ असून एकूण पाच बक्षीसांचा समावेश आहे. या होणाऱ्या तान्हा पोळा उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
घोंसा येथे मोफत नेत्र चिकित्सा, मोती बिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 02, 2024
Rating: