पुलावरून ट्रक कोसळला विदर्भ नदी पात्रात...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील मुकुटबन मार्गावरील नेरड (पुरड) जवळील विदर्भा नदीच्या पुलावरून ट्रक नदीपात्रात कोसळला. ही घटना शनिवारी रात्रीची असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या अपघातानंतर सदर ट्रकचा चालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे. 

शनिवारी सायंकाळी वणी परिसरात अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि पाहता पाहता नदी नाले ओसंडून वाहू लागले, सतत दोन तास पाऊस कोसळल्याने वणी-मुकुटबन मार्गावरील नदी नाल्यांना पुर आला होता. 

दरम्यान, ट्रक चालक हा रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास वणी मुकुटबन मार्गाने मुकुटबन येथिल एका कंपनीचा ट्रक घेऊन जात असताना नेरड (पुरड) जवळील विदर्भा नदीच्या पुलावरून ट्रक नदीपात्रात कोसळला, या अपघातानंतर सदर ट्रकचा चालक मात्र आढळून आला नाही,तो अजुनही बेपत्ता आहे. 

ही धक्कादायक घटना सकाळी निदर्शनास आल्यानंतर त्याठिकाणी बघ्यानी तोबा गर्दी दिसून आली. सरद ट्रक चालक हा वणी येथील रमाकांत शास्त्रीकर असल्याची माहिती मिळाली आहे.
पुलावरून ट्रक कोसळला विदर्भ नदी पात्रात... पुलावरून ट्रक कोसळला विदर्भ नदी पात्रात... Reviewed by सह्याद्री चौफेर on September 02, 2024 Rating: 5
Powered by Blogger.