सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : "पोळा" बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पोळा हा सण श्रावण महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो, याला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात. तो ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येतो.
पोळा निमित्ताने तालुक्यातील पिसगांव येथील मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी उत्कृष्ट सजवलेल्या नटून थटून बैलजोडी कडे बळीराजा सह महिला पुरुष बालगोपालांचे लक्ष वेधले होते. पारंपरिक सजावटीने 'सर्जा राजा'ची ही जोडी पोळ्यात दृष्ट लागावी अशी आकर्षित करत होती. दरम्यान, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या बैल जोडीने पिसगाव येथील पोळ्याचे कुतूहल वाढवले असून सर्वत्र परिसरामध्ये बैल सजावटीचे सालगड्यासह मालकाचे अभिनंदनसह कौतुक होत आहे.
तालुकाध्यक्षांच्या बैलजोडीने वेधले ग्रामस्थांचे लक्ष
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 02, 2024
Rating: