सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
निवेदनात नमुद असे की,सौ.सुनीता गजानन शिंदे, ही लहानपणापासुन सुदृढ व चांगल्या प्रकृतीची होती. परंतु अचानक तिला ताप येऊन थंडी वाजत असल्यामुळे दि. १४/०७/२०२४ रोजी सुनीता हीला भावसार चौक, मालेगाव रोड नांदेड येथील डॉ. राजेश चव्हाण यांच्या दवाखाण्यांत नेले असता डॉ. चव्हाण, यांनी सुनीताला दोन सलाईन लावल्या व त्यात दोन इंजेक्शन टाकले आणि कंबरे मध्ये दोन इंजेक्शन दिले. सलाईन आणि इंजेक्शन हे डॉक्टरांनी स्वतः जवळचे दिले त्यानंतर सुनिता ही अस्वस्थ झाली आणि धडपड करु लागली त्यानंतर डॉ. चव्हाण ह्यांनी त्यांच्या ओळखीचे डॉक्टर यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्या हॉस्पीटल मध्ये तिला घेऊन जाण्यास सांगीतले. तेथे डॉक्टरांनी तपासुन सांगीतले की, पेशेंट सिरीयस आहे. त्यांनी असेही सांगितले की, तुमच्या जिम्मेदारीवर तुम्ही तयार असाल तर ईलाज करतो. असे म्हणून फॉर्मवर सह्या घेतल्या परंतु त्यावेळीस सुनीता बेसुध्द होती.
सुनीताचा दि.१६/०७/२०२४ रोजी सकाळी मृत्यू झाला. डॉ. चव्हाण यांच्या निष्काळजी पणामुळे आणि चुकीचा ईलाजामुळे दोन मुलाची आई दगावली. दि. १६/०७/२०२४ रोजी पोलीस स्टेशन भाग्य नगर, नांदेड येथे अर्ज दिल्यावरुन मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे.दरम्यान डॉ. चव्हाण यांनी त्यांच्या दवाखाण्यात १४-१५ डॉक्टरांना आणि एका वकीला ला बोलवुन ठेवले होते. अशी तक्रार पिडीत परिवाराची असून चैनल वाले जेंव्हा डॉक्टरकडे चौकशीला गेले तेंव्हा डॉ. चव्हाण यांनी काहीही खुलासा दिला नाही. मात्र, डॉ. चव्हाण हे राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून पोलीस प्रशासनावर दबाव तंत्र वापरून सदर प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न करत आहे. असा लोहराळकर यांनी आरोप देखील केला आहे.
त्यामुळेच मृतक सुनीता हिला न्याय मिळावा व तीच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत मिळावी व या प्रकरणी जातीने लक्ष देऊन प्रकरणाची सखोल चौकशी करावी.आणि चुकीचा उपचार करणाऱ्या डॉक्टर वर योग्य ते कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी सीमा स्वामी लोहराळकर, रंजनी मडपल्लेवार यांनी केली आहे.