सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार
पाटणबोरी : ९ ऑगस्ट हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील मैलाचा दगड ठरलेला दिवस क्रांती दिवस म्हणून ओळखल्या जातो तर दुसरी कडे जगात आदिवासींची ओळख लुप्त होत असताना त्यांची संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी जागतिक आदिवासी दिन म्हणून संयुक्त राष्ट्र परिषदेने साजरा करण्याचे ठरविले. ह्याच दिवसाचे महत्व जाणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व आदिवासी अधिकार मंच च्या संयुक्त विद्यमाने पाटणबोरी येथे आदिवासीं व इतर पारंपरिक वन निवासी जनजातीच्या जल, जंगल व जमिनीवरील अधिकार शाबूत ठेवण्यासाठी आदिवासी जनआक्रोश रॅली व वनअधिकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या जन आक्रोश रॅली व वन अधिकार मेळाव्याचे अध्यक्षस्थानी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. चंद्रशेखर सिडाम राहणार असून उद्घाटक म्हणून माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. सुनील मालुसरे (पालघर) तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे केंद्रीय कमिटी सदस्य कॉ. किसन गुजर ( नाशिक ) मार्गदर्शन करणार आहेत. यावेळेस माकपचे जिल्हा सचिव कॉ. ऍड. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ. ऍड. दिलीप परचाके, जनवादी महिला समितीचा कॉ. अनिता खुनकर, माकपचे जि. क. सदस्य कॉ. मनीष इसाळकर, आशा संघटनेचे जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. मनोज काळे हे सुद्धा वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जन आक्रोश रॅली दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोज शुक्रवारला राम मंदिर येथून काढून बालाजी नगर येथील कॉ. गोविंदराव सिडाम विचारमंच, कालिका सभागृहात पोहोचेल त्यानंतर तिथे वन अधिकार मेळावा होईल. ह्या मेळाव्यात अनेक महत्वपूर्ण मागण्यांचे ठराव पारित करून अधिकाऱ्यांना निवेदन करण्यात येईल. तसेच या मेळाव्यात संबंधित विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करून पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे.
या मेळाव्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आदिवासी कार्यकर्त्यांचे सत्कार करून त्यांना मानचिन्ह देण्यात येणार आहे. करीता या जन आक्रोश रॅली व वनाधिकार मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन सर्व कॉ. कवडू चांदेकर, किसन मोहरले, खुशालराव सोयाम, सुरेखा बिरकुरवार, सुधाकर सोनटक्के, सदाशिव आत्राम, गजानन ताकसांडे, अमोल चटप, संजय वालकोंडे, रामभाऊ जिद्देवार, संजय कोडपे, भाऊराव टेकाम, शंकर गाऊत्रे, बळीराम मेश्राम, रामराव टेकाम, अय्या आत्राम, हुसेन आत्राम, हिरामण कनाके, भारत टेकाम, सुमित्रा भोंग, अनुसया गेडाम, अंकलु गोनलावार, सोनू आत्राम, शोभाबाई सिडाम, रघुनाथ मेश्राम, विठ्ठल सांकरवार आदींनी केली आहे.