सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : गावाच्या विकसासाठी सैदव शासन दरबारी झटत असलेले उमदा उपसरपंच सचिन रासेकर यांच्या पुढाकारातून सरपंच सौ.वर्षां राजूरकर व ग्रामसेवक यांच्या मदतीने गावातील अंगणवाडयांना गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले.
यावेळी आशा सेविका अक्षरा कास्तकार, कविता वनकर, व अंगणवाडी सेविका सौ.मीरा मडावी, रेश्मा वनकर, गीता नरांजे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
शासनाकडून विद्यार्थ्यांना मिळत असलेला पोषण आहार शिजविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना इंधनाची मोठी समस्या भासत होती. त्यामुळे अन्न शिजवण्यासाठी गॅस कनेक्शनची अत्यंत आवश्यकता असल्याची बाब ही प्रामुख्याने मोहदा ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. रासेकर यांनी लक्षात घेऊन सामान्य निधीतून तशी तरतूद करून अंगणवाडी सेविकांची आग्रही मागणी पूर्ण करत येथील तीनही अंगणवाड्यांना गॅस कनेक्शन ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले आहे.
मोहदा ग्रामपंचायत तर्फे अंगणवाडयांना गॅस कनेक्शन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 08, 2024
Rating: