पोलीस प्रशासनाच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : जिल्ह्यातील आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबाबत शासन प्रशासन किती गंभीर आहे हे एका पिडीत तरुणीच्या तक्रारी वरून समोर आले आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल असूनही त्यांना अजून पर्यंत पोलिसांनी अटक केली नाही. पोलीस प्रशासनाच्या विरोधात आदिवासी टायगर सेना च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 

आदिवासी टायगर सेना चंद्रपूर च्या वतीने आदिवासी तरुणीवर अत्याचार व फसवणूक प्रकरणाचा पाठपुरावा करीत असताना अत्यंत धक्कादायक बातमी मिळाली की, आरोपींनी पिढीत मुलीच्या बाबतीत कुठलीही हयगय न करता, अश्लील शिवीगाळ, अंगावर हात टाकून तिचे केस पकडून मारहाण करण्यात आली. पोलिस स्टेशन दुर्गापूर येथे सुद्धा तिची तक्रार घेतल्यानंतर तीन दिवसांनी तिची FIR घेऊन तिला रात्री एकटीला १ वा.घरी पाठविण्यात आले.

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन सुद्धा, ४० दिवसानंतर ही पोलिस विभाग अटक करायला तयार नाही, तेच आरोपी पिढीत मुलीला धमकी देत असतात की, तू कुठंही गेली तरी तुला काही मिळणार नाही. आम्ही पोलिसांना पैसे देऊन आहोत, तू केस वापस घे अश्या प्रकारच्या धमकी बद्दल पिडी त मुलींनी उपविभागीय पोलिस अधिकारी ह्यांना सांगितले असता, उडवा उडवी चे उत्तर पोलिस उप विभागीय अधिकारी देत आहे अशी माहिती पिढीत मुलींनी दिली आहे.
   
आदिवासी टायगर सेना चंद्रपूर च्या वतीने पोलिस अधीक्षक चंद्रपूर, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रपूर, ह्यांच्या भेटी देऊन प्रकरणाचा गांभीर्य समजवून सांगितले. तरीही पोलिस विभागाला जाग येत नाही असे दिसताच आज दिनांक ५/७/२०२४ रोजी जिल्हाधिकारी ह्यांच्या कार्यालय समोर पोलिस विभागाविरुध्द एक दिवसीय धरणे आंदोलन देण्यात आले.

या एक दिवसीय धरणे आंदोलनास विविध सामाजिक संघटना चा पाठिंबा देण्यात आला. त्यात, ओबीसी सेवा महासंघ चे नेते सचिन राजूरकर, भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस चे कादर शेख, इरफान शेख, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे प्रमोद बोरीकर, कृष्णा मसराम, बिरसा क्रांती दल चंद्रपूर ओंकार गेडाम, राजेंद्र धुर्वे, बिरसा सेनेचे कमलेश आत्राम, सोशल एज्युकेशन मुमेंट चे भास्कर मून, ह्यांनी पिढीत मुलीला न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व सामाजिक संघटना च्या वतीने रस्ता रोको आंदोलन व चक्का जाम आंदोलन करू असा गर्भीत इशाराही देण्यात आला आहे.

या समोरही आम्ही सर्व आदिवासी टायगर सेना च्या पाठीशी राहून पिढीत मुलीला न्याय मिळून देऊ अशी माहिती सर्व सामाजिक संघटना च्या पदाधिकारीनी यावेळी दिली.
   
या आंदोलनात आदिवासी टायगर सेनाचे अ‍ॅड. संतोष कुळमेथे, विदर्भ अध्यक्ष, जितेश कुळमेथे विदर्भ महासचिव, सुमित्रा आलाम विदर्भ महा, माया पेण्डोर विदर्भ प्रवक्त्या, इंजी. अभिलाष परचाके विदर्भ युवा अध्यक्ष, आयुष मडावी युवा उपाध्याय, निशीगंधा मडावी विदर्भ उपाध्यक्ष युवती, आकाश गेडाम विदर्भ प्रसिध्दी प्रमुख,प्रा.हितेश मडावी जिल्हा अध्यक्ष, वैशाली मेश्राम जिल्हा अध्यक्ष कामगार महिला,माजी सैनिक ड्रेफुल आत्राम जिल्हा उपाध्यक्ष, यशोधरा उईके जिल्हा महासचिव, सोज्वळ कुमरे जिल्हा उपाध्यक्ष, दीपक पेंदोर जिल्हा युवा उपाध्यक्ष, प्रियांका मडावी जिल्हा युवती अध्यक्ष, रंजीत मडावी जिल्हा युवा अध्यक्ष, राहुल पेंदाम जिल्हा युवा उपाध्यक्ष, विराज सुरपाम जिल्हा महासचिव, दामिनी मडावी जिल्हा युवती तालुका अध्यक्ष बल्लारपूर, रज्जु कुळसंगे जिल्हा युवती उपाध्यक्ष, भाग्यश्री कुमरे जिल्हा कोष्याध्यक्ष महिला, सावन ऊईके जिल्हा सदस्य, बाळू कुळमेथे जिल्हा सदस्य, सूरज गावडे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन पोलीस प्रशासनाच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on July 05, 2024 Rating: 5
Powered by Blogger.