मार्डी येथील आरोग्य शिबिरात पाचशे रुग्णांनी घेतला लाभ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मार्डी येथे त्रिमूर्ती मंगल कार्यालयात दिनांक 4 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत स्व.पारसमल चोरडिया फाऊंडेशन, वणी यांच्या विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

वणी उपविभागीय क्षेत्रात गेल्या 30 वर्षांपासून जनसेवेचे कंन्कर बांधलेले विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायीत्वातुन कस्तुरबा हास्पीटल, सेवाग्राम व चोरडीया हास्पीटल, वणी येथील तज्ञ डॉक्टरांकडुन आरोग्य तपासणी करण्यात आली. 40 पेशंट ऑपरेशन साठी कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे पाठवण्यात आले. शिबिरात बीपी, शुगर, इसीजी व फिजिकल चेकअप 400 रुग्णांचे करण्यात आले आहे. व रुग्णांना औषधी वाटप करण्यात आली असून 450 रुग्णांना दि.16 जुलै 2024 ला मार्डी येथील महादेव मंदिरात चष्मा वाटप करण्यात येणार आहे, असे सामाजिक कार्यकर्ते विजय बाबू चोरडिया यांनी सांगितले.

दरम्यान,आरोग्य शिबिरात आलेल्या सर्व रुग्णांसह सोबत आलेल्यांना श्री.चोरडिया यांच्या तर्फे चाय, नास्ता व भोजन व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. मंचावर विजय चोरडिया डॉ. हेडगे, सौ. प्रतिभा तातेड (पत्रकार), कु. स्वाती ठेंगणे (सामाजिक कार्यकर्त्या), प्रशांत भंडारी (उपसरपंच वनोजा), भास्कर धानफुले सर, डॉ. रोहीत चोरडिया, मंगेश देशपांडे, उपस्थित होते. या शिबिराचे आयोजक विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, वणी, पांढरकवडा, यवतमाळ, व चोरडिया हॉस्पिटल, वणी यांनी केले होते.
मार्डी येथील आरोग्य शिबिरात पाचशे रुग्णांनी घेतला लाभ मार्डी येथील आरोग्य शिबिरात पाचशे रुग्णांनी घेतला लाभ Reviewed by सह्याद्री चौफेर on July 05, 2024 Rating: 5
Powered by Blogger.