सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : आगामी विधानसभेच्या निवडणुका व कार्यकारणी घोषित करण्याकरिता व इतर विषयावर चर्चे करिता येथील जेष्ठ नागरिक भवन येथे रविवार दि.१ जुलै२०२४ रोजी दुपारी २ वाजता मारेगाव भाजपा तालुक्याची बैठक आयोजित करण्यात आली होती.
वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ जिल्हा अध्यक्ष श्री.तारेंद्र भाऊ बोर्डे माजी जिला अध्यक्ष श्री.राजेंद्र डांगे, तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.
मागील लोकसभा निवडणूकीत मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाने खऱ्या अर्थाने मोठा विजय मिळवला. देशात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने कडे आज पाहालं जातं आहे. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूकीत सुद्धा आपल्याला विजय मिळवायचा आहे. त्यासाठी आतापासूनच सर्वांनी कामाला लागण्याच्या सूचना आमदार बोदकुरवार यांनी बैठकीत बोलताना उपस्थित मान्यवरांना दिल्या. तर जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी सुद्धा आपले विचार मांडले.
तसेच माजी जिला अध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी आपला परिचय देत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व प्रदेश व जिल्हा उपाध्यक्ष पदाधिकारी, महिला आघाडी तालुक्याची कार्यकारणी, मंडळाचे सर्व आघाड्याची कार्यकारणी, पंचायत समिती प्रमुख, जिल्हा परिषद प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, सुपर वोअरियर, आजी-माजी पदाधिकारी व सर्व प्रमुख विद्यमान पदाधिकारी
यांना येणारी निवडणूक कशी जिंकता येइल याचे सखोल व परिपूर्ण मार्गदर्शन व निवडणूक रूपरेषा समजावून सांगितली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ता.अध्यक्ष अविनाश लांबट यांनी केले.
बैठकीच्या शेवटी तालुक्यातील नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली,एकूण ६८ आजी माजींना तालुक्याचा विविध पदभार देण्यात आले. यात युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष गणेश झाडे यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश झाडे यांची भारतीय जनता पक्षाच्या मारेगाव तालुका सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल सर्व प्रदेश व जिल्हा उपाध्यक्ष पदाधिकारी,महिला आघाडी तालुक्याची कार्यकारणी, मंडळाचे सेर्व आघाड्याची कार्यकारणी, पंचायत समिती प्रमुख, जिल्हा परिषद प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, सुपर वोअरियर, नगरसेवक, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सरपंच-उपसरपंच, सर्व सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी कौतुकासह अभिनंदन केले.
सरचिटणीस पदी गणेश झाडे यांची नियुक्ती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 02, 2024
Rating: